यंदाची महाशिवरात्री साजरी होणार ‘या’ विशेष संयोगात; तिथी आणि मुहुर्त पाहून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवभक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे महाशिवरात्री (Mahashivratr)i. यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी आली आहे. यावेळी दिवसभर श्रवण नक्षत्रानंतर धनिष्ठा नक्षत्र राहणार आहे. महाशिवरात्री च्या शुभ दिवशी कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. त्यामुळेच यंदा विशेष संयोगामध्ये सर्वार्थसिद्धी योगात महादेवाची पूजा करण्यात येईल. असे म्हणतात की, ज्यावेळी नक्षत्र, योग आणि ग्रह अनुकूल स्थितीत असतात तेव्हा शिव शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. असे दुर्मिळ योग 300 वर्षांमध्ये फक्त एकदा किंवा दोनदा येतात.

महाशिवरात्री तिथी

दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येते. त्यानुसार आठ मार्च रोजी चतुर्दशी तिथी 9.57 ते 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.17 पर्यंत असेल. त्यामुळेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल.

पूजेची मुहूर्त

महाशिवरात्रीची पहिली पूजा संध्याकाळी 6.25 ते 9.28 वाजता करावी. दुसरी पूजा रात्री 9.29 ते 12.31 या वेळेत करावी. तिसरी पूजा 12.32 ते 3.34 या वेळेत करावी. चौथी पूजा 3.35 ते 6.37 या वेळेत करावी. यात 9 मार्च रोजी पारणाची वेळ सायंकाळी 6.38 ते 3.29 असेल. पूजा करताना सर्व विधी व्यवस्थित पार पाडाव्यात. तसेच, त्रयोदशीच्या एक दिवस आधी अन्नग्रहण करू नये.

यावर्षी तब्बल 300 वर्षांनंतर सूर्य, शनि आणि बुध यांचा संयोग होत असल्यामुळे यंदाची महाशिवरात्री अत्यंत विशेष ठरणार आहे. याशिवरात्रीला शिव सिद्ध आणि श्रावण नक्षत्रे तयार होतील. त्यामुळे मनोभावे शिव शंकराची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर श्रवण नक्षत्रात कोणतेही चांगले काम केल्यास त्याचे पुण्य नक्की मिळेल. तसेच, तुम्हाला मिळालेला आशीर्वाद वरदान ठरेल.