Mahatma Gandhi Punyatithi 2024 : गांधीजींचे 8 अनमोल विचार, जे तुम्ही नक्कीच आचरणात आणू शकता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी (Mahatma Gandhi Punyatithi 2024) आहे. महात्मा गांधी आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि आदर्शाच्या मार्गावर चालत राहिले. मात्र अहिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या महात्मा गांधींवर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आज जगभरात महात्मा गांधींना अहिंसेचे प्रतीक मानले जाते. जगभरातील लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात. आज महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त (Mahatma Gandhi Punyatithi 2024) त्यांचे अनमोल विचार आज आपण जाणून घेणार आहोत.

गांधीजींचे अनमोल विचार खालीलप्रमाणे – Mahatma Gandhi Punyatithi 2024

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. सोन्या-चांदीचे मूल्य या तुलनेत काहीच नाही.

महात्मा गांधी म्हणाले होते की भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्मा मारतो

गुलाबाला उपदेशाची गरज नसते, तो फक्त त्याचा सुगंध पसरवतो. सुगंध हाच त्याचा संदेश आहे.

अभिमान हे ध्येयासाठी झटण्यात आहे, ते गाठण्यात नाही.

तुम्हाला जगात जो बदल बघायचा आहे, तो आधी स्वतःमध्ये आणा असा उपदेश महात्मा गांधीजी करायचे

गांधीजी नेहमी म्हणायचे कि, तुम्हाला काही करायचेच असेल तर प्रेमाने करा, नाहीतर करू नका. प्रेम हे शूरांचे लक्षण आहे, भित्री लोक प्रेम करूच शकता नाहीत असेही त्यांनी संगीतले होते.

क्रूरतेला क्रूरतेने प्रत्युत्तर देणे म्हणजे एखाद्याचे नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणे होय.

महात्मा गांधींच्या मते, तुम्ही जे करता ते क्षुल्लक असू शकते, पण ते करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.