गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘मविआ’त जागावाटपाचा तिढा सुटला!! कोणाला किती जागा मिळाल्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. आजच्या या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांकडून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यानुसार, शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांसाठी निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे, आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटल्यामुळे राजकिय हालचालींचा वेग वाढला आहे.

सांगली आणि भिवंडीच्या जागांचा तिढा सुटला

आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता सांगलीची जागा शिवसेना लढणार आहे. तर भिवंडीतील मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहणार आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 21-17-10 असा फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत 21 जागांसाठी शिवसेना ठाकरे गट लढणार आहे. तर 17 जागा जागांसाठी काँग्रेस लढेल. याबरोबर राष्ट्रवादी पक्षाकडे 10 जागा देण्यात आले आहेत.

काँग्रेसकडे कोणत्या जागा?

नंदूरबार, धुळे, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, जालना, मुंबई उत्तर मध्य, उत्तर मुंबई, रामटे

राष्ट्रवादीकडे कोणत्या जागा?

बारामती, शिरुर, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण

शिवसेनेकडे कोणत्या जागा?

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य, पालघर, कल्याण, मावळ, धाराशीव, हातकणांगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली