महाविकास आघाडीचं संभाव्य जागावाटप ठरलं? कोणत्या पक्षाला किती जागा पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) संभाव्य जागावाटप ठरलं आहे. त्यानुसार, शिवसेना ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर निवडणूक लढवू शकते. जर प्रकाश आंबेड यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाली तर तिन्ही पक्ष आपल्या काही जागा वंचित साठी सोडतील असं म्हंटल जात आहे. हे एकूणच जागावाटप बघितलं तर ठाकरे गट मोठा भाऊ ठरल्याचे दिसत आहे.

ठाकरे गट कोणत्या जागा लढवू शकते –

रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई … तर हातकंगणले येथे उद्धव ठाकरे राजू शेट्टी याना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कोणत्या जागा लढवू शकते –

नागपूर, भंडारा- गोंदिया, रामटेक, चंद्रपूर, अमरावती, अकोला, लातूर, जालना, नांदेड, धुळे, पुणे, नंदुरबार, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई, सोलापूर

शरद पवारांचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात उभे राहतील –

बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, सातारा, रावेर, अहमदनगर, वर्धा, रावेर… तर म्हाढा येथे शरद पवार महादेव जानकर याना पाठिंबा देऊ शकतात.