महावितरणचे कर्मचारी संपावर अन् सातारकर अंधारात, लाईट गेली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी खासगीकरणा विरोधात आक्रमक होत 3 दिवस संपावर गेले आहेत. याच दरम्यान, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणी लाईट गेल्याने सातारकर अंधाराखाली गेला आहे. त्यामुळे आता गेल्या 5 तासापासून हा भाग अंधारात आहे. कर्मचाऱ्याच्या या संपामुळे अजून किती काळ अंधारात रहावे लागणार याबाबत काही माहिती मिळत नसल्याने सातारकर चिंतेत आहेत.

राज्यात महावितरणचे खाजगीकरण होऊ नये, यासाठी साताऱ्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाच्या बाहेर “गो बॅक अदानी, अदानीचं करायचं काय खाली मुंडी वर पाय” अशा घोषणाबाजी करत संप पुकारला आहे. महावितरण कंपनी अदानी, अंबानी यांच्याकडे जात असल्याने महावितरणचे खाजगीकरण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना वीज परवडणार नाही. महावितरणचे खाजगीकरण होऊ नये, यासाठी 3 जानेवारी ते 6 जानेवारी असे 3 दिवस बेमुदत संप सुरू झाला आहे.

साताऱ्यात महावितरणच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागात (काही ठिकाणी) वीजपुरवठा बंद झाला आहे. अशातच महावितरणचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहे. यामुळे वीज प्रवाह खंडित झाल्याने याचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलेला आहे.