Mahavitaran Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता राज्यात मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. आणि या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा.
महावितरणाकडून (Mahavitaran Recruitment 2024) ही एक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबद्दलची अधीसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महावितरण विभागात नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया सरळसेवा भरती आहे. या भरतीमध्ये ज्युनिअर असिस्टंट अकाउंट या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ही भरती प्रक्रिया नक्की काय असणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता
या भरतीच प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीएमएस, बीबीए, एमएससीआयटी, बी.कॉम किंवा कॉम्प्युटर सायन्स पदवी असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
महावितरणाच्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 32 दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. केवळ याच वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज पद्धती | Mahavitaran Recruitment 2024
महावितरणमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकर लगेचच महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन हा फॉर्म भरायचा आहे
परीक्षा स्वरूप
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा 150 मार्कांची असणार आहे.
अर्जशुल्क
महावितरणाच्या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे तुम्ही आता अजिबात वेळ न दवडता लवकरात लवकर महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे