धनत्रयोदशीदिवशी जुळतोय तब्बल 400 वर्षांनंतरचा महायोग; या राशीतील लोकांचे नशीब उजळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी माता श्री गणेश आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्यात येते. त्यामुळे आजचा दिवस एखाद्या नवीन कार्य करण्यासाठी शुभ मानला जातो. विशेष भाग म्हणजे आज धनत्रयोदशी दिवशी तब्बल 400 वर्षांनंतर शुभ योग, धन योग जुळून आला आहे. असे योग जुळून आल्यास त्याला महायोग असे देखील म्हटले जाते. आज शुभ योग आणि धन योग एकत्र असल्यामुळे अनेक शुभ कार्य मार्गे लागू शकतात. तसेच घरात धन येऊ शकतो. परंतु यासाठी मनोभावे लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवताची पूजा करणे गरजेचे आहे.

या राशींचे नशीब उजळणार

आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र योग सकाळी 07:57 ते 10:29 या कालावधीत आहे. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग सकाळी 07:57 पासून रात्रीपर्यंत सुरू होणार आहे. या दुर्मिळ योगमुळे 4 राशींना जबदरस्त फायदा होणार आहे. मकर रास, कर्क रास, कन्या राशी आणि वृषभ राशी अशा चार राशींचे नशीब उजळून निघू शकतो. आज ज्या व्यक्तींची रास मकर, कर्क , कन्या आणि वृषभ आहे, त्यांनी अवश्य धनत्रयोदशी देवतांची मुहूर्तावर पूजा करावी. तसेच, त्यांना नैवेद्य अर्पण करावा.

मकर रास – आज मकर रास असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडू शकतात. तब्बल 400 वर्षांनी धन आणि शुभ योग जुळून आल्यामुळे मकर राशीच्या लोकांवर लक्ष्मी माता आणि कुबेराची कृपा राहणार आहे. ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येईल.

कर्क रास – या राशीतील लोकांना अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच हातामध्ये पैसे येतील आणि आर्थिक भरभराट होईल. यापूर्वी कर्क राशीचे योग चांगले नव्हते. परंतु महायोग जोडून आल्यामुळे या राशीतील लोकांना आयुष्यात एखादया कार्यात मोठा फायदा होणार आहे.

कन्या – आज कन्या राशीतील लोकांवर कुबेराची विशेष कृपा राहणार आहे. ज्यामुळे या राशीतील लोकांच्या आयुष्यातील सर्व आर्थिक करताना दूर होतील. तसेच दुरावलेली नाती जवळ येतील. या राशीतील लोकांना एखाद्या व्यवसायात यश देखील मिळेल.

वृषभ रास – धनत्रयोदशीदिवशी शुभ योग तयार होत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर कुबेराची कृपा होणार आहे. ही रास असणाऱ्या व्यक्तींच्या घरात आज धनसंपत्ती येईल. तसेच आजपासून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.