उन्हाच्या तडाख्यामुळे परीक्षा वेळापत्रकात बदल करा; कोणी केली मागणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उन्हाचा चटका वाढत असून , यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच कारणांमुळे प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी राज्यातील शालेय परीक्षा वेळापत्रकावर पुन्हा विचार अन त्यात आवश्यक तो बदल करावा , अशी मागणी केली आहे.

वेळापत्रकावर पुनर्विचार करण्याची मागणी –

प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी राज्यातील शालेय परीक्षा वेळापत्रकावर पुनर्विचार करण्याची मागणी केली असून , महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात ठाकरे यांनी राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्याबाबत आहे.

सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात –

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात 8 ते 25 या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या परीक्षा 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पाचवी ते नववीच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक दिले असून, हे सर्व ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

ठाकरे यांची मागणी –

ठाकरे यांनी निवेदनातून शालेय व्यवस्थापनावर अधिक जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. विविध जिल्ह्यांमधील भौगोलिक परिस्थिती आणि उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता, परीक्षांचे नियोजन शालेय व्यवस्थापनावर सोपविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.