महिला सन्मान योजनेचा अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात; ही आहेत महत्वाची कागदपत्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. अशातच महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आजपासून म्हणजेच 23 डिसेंबर पासून महिला सन्मान योजना साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आहे.

2024 आणि 25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची चर्चा झाली होती. याआधी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील महिलांना 1 हजार रुपये दिले जात होते. परंतु आता निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तुम्ही आजपासून या योजनेसाठी अर्ज करू शकता. यासाठी महिलांना कुठेही जायची गरज नाही. बाकीचे लोक त्यांच्या घरी येऊन नोंदणी करतील. आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड देखील दिले जाईल. त्या कार्डची सुरक्षितपणे काळजी घ्यायची आहे. नोंदणी झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आवश्यक कागदपत्र

मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे त्यांच्या आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक खात्याचे तपशील, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, पाणी बिल, किंवा रेशन कार्ड ही कागदपत्र असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसेल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाणार नाही.