Mahindra CNG Pik Up : महिंद्राची CNG पिकअप, 400 KM रेंज; व्यावसायिकांना होणार फायदा

Mahindra CNG Pik Up
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mahindra CNG Pik Up । छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायासाठी महिंद्रा अँड महिंद्राने एक नवीन पिकअप गाडी लाँच केली आहे. Bolero MaXX Pik-Up HD 1.9 CNG असं या पिकअपचे नाव असून महिंद्राची हि पहिलीवहिली CNG पिकअप गाडी आहे. या पिकअपची रेंज तब्बल ४०० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही पिक-अप १.८५ टन पर्यंत वजन उचलू शकते असेही कंपनीने म्हंटल आहे. सध्या मार्केट मध्ये ११.१९ लाख रुपयांच्या किमतीत या CNG पिकअपचे लौंचिंग करण्यात आलं आहे. आज आपण या पिकअप गाडीचे खास फीचर्स, इंजिन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

इंजिंग – Mahindra CNG Pik Up

बोलेरो मॅक्स पिक-अप एचडी १.९ सीएनजीमध्ये २.५-लिटर टर्बोचार्ज्ड सीएनजी इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडलं असून ८२ पीएस पॉवर आणि २२० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यात १८०-लिटर सीएनजी टँक आहे. एकदा का CNG भरला कि हि पिकअप गाडी तब्बल 400 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच काय तर खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच ही CNG पिकअप गाडी बनवण्यात आली आहे. (Mahindra CNG Pik Up)

या पिकअप (Mahindra CNG Pik Up) गाडीची पेलोड क्षमता १.८५ टन आहे. त्यामुळेच एकाच प्रवासात तुम्ही जास्तीच्या सामानाची वाहतूक या पिकअपच्या माध्यमातून करू शकता. तसेच यामध्ये एसी, हीटर, हायड अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्रायव्हरसोबत दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, पॉवर स्टीअरिंग, कनेक्टेड टेक्नॉलॉजी, ३०५० मिमी कार्गो बेड यांसारखी फीचर्स आहेत. गाडीला मजबूत १६-इंच टायर्स आणि पुढील आणि मागील दोन्ही एक्सलवर टिकाऊ लीफ स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलं आहे. ज्यामुळे कोणत्याही रस्त्यावर आणि कितीही मोठा भार असला तरी आरामदायी वाहतूक करता येते. ड्रायव्हर व्यतिरिक्त, त्यात आणखी दोन लोक बसू शकतात. या पिकअप मध्ये iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशनद्वारे समर्थित अत्याधुनिक कनेक्टेड टेक्निक दिले आहे. ही नवीन सिस्टीम रिअल टाइममध्ये वाहन माहिती देते ज्यामुळे ऑपरेशनल कार्यक्षमता सुनिश्चित होते.

किंमत किती?

या पिकअप गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, महिंद्राने बोलेरो मॅक्स पिक-अप एचडी १.९ सीएनजी ११.१९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे.