हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा एंड महिंद्रा ने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. महिंद्राने Scorpio N च्या किमतीत तब्बल 51,299 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. गेल्या चार महिन्यांत या SUV च्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता Mahindra Scorpio N ची किंमत 13.06 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी या गाडीची किंमत 11.99 लाख रुपये होती. कंपनीने यापूर्वी जानेवारी महिन्यात आपल्या गाड्यांच्या किमतीत 15,000 ते 1.01 लाख रुपयांपर्यंत वाढ केली होती.
Mahindra Scorpio N मध्ये काय खास आहे?
Mahindra Scorpio N मध्ये २ इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यातील एक म्हणजे 2.2-litre mHawk डिझेल इंजिन जे 132PS/300Nm पॉवर आउटपुट आणि 175PS/370Nm (AT सह 400 Nm) पॉवर आउटपुट जनरेट करू शकते. आणि दुसरं म्हणजे 2.0-litre mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन जे 203PS पॉवर आणि 370 Nm पीक टॉर्क (AT सह 380Nm) जनरेट करते. यातील डिझेल इंजिनला 4WD कॉन्फिगरेशनचा पर्याय देखील मिळतो.
महत्वाचे म्हणजे या एसयूव्हीची किंमत आतापर्यंत २ वेळा वाढवून सुद्धा ही कार देशातील सर्वात स्वस्त आणि परवडणारी 7 सीटर एसयूव्ही ठरत आहे. भारतीय बाजारात ही SUV MG Hector Plus, Tata Safari आणि Hyundai Alcazar ला तगडी फाईट देईल असं म्हंटल जात आहे.