Mahindra Thar Earth Edition : Mahindra ने लाँच केलं Thar चे Earth Edition; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahindra Thar Earth Edition : प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्राची Thar ही SUV कार प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालते. ग्राहकांची पसंती पाहता महिंद्रा आपल्या थारला नवनवीन व्हर्जनमध्ये लाँच करत असते. आताही कंपनीने बाजारात Mahindra Thar चे स्पेशल एडिशन लॉन्च केलं आहे. Mahindra Thar Earth Edition असे या SUV चे नाव असून यामध्ये कंपनीने अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. वाळवंटातून प्रेरित ही नवीन थार एसयूव्ही 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असून तिची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपयांपासून सुरू होते.

Thar Earth Edition ला खास असं वेगळेपण यावं यासाठी बाहेरील भागावर साटन मॅट पेंट स्कीम “डेझर्ट फ्युरी वापरण्यात आली आहे. त्याच्या मागील फेंडर्स आणि दरवाजांवर डून-प्रेरित डिकल्स, मॅट ब्लॅक बॅज आणि सिल्व्हर फिनिश्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. त्याच्या बी-पिलरवर अर्थ एडिशन” बॅजिंग डिझाईन करण्यात आली आहे. एकूण काय तर दिसायला हि महिंद्रा थर अर्थ एडिशन अतिशय आकर्षक अशी आहे. गाडीच्या इंटेरिअल बद्दल सांगायचं झाल्यास, आतील भागात ड्युअल-टोन (काळा आणि हलका बेज) स्कीम मिळते. गाडीच्या दरवाजांमध्ये थार ब्रँडिंग करण्यात आलं आहे. संपूर्ण केबिन मध्ये डार्क क्रोम एक्सेंट फिनिश देण्यात आले आहे. एसी व्हेंट्स, सेंटर कन्सोल आणि स्टीयरिंग व्हीलमध्ये डेझर्ट फ्युरी कलर इन्सर्ट जोडले आहे.

पॉवरट्रेन – Mahindra Thar Earth Edition

महिंद्रा थार अर्थ एडिशन (Mahindra Thar Earth Edition) पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आले आहे. यातील पेट्रोल मॉडेलमध्ये 2.0-लिटर mStallion टर्बोचार्ज इंजिन बसवण्यात आले असून हे इंजिन 150bhp पॉवर आणि 300Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे, डिझेल मॉडेलमध्ये 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 130bhp पॉवर आणि 300-320Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मैनुअल आणि 6-स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे.