Mahindra Thar Roxx Launched : 12.99 लाख रुपयांत लाँच झाली 5-डोर Mahindra Thar Roxx

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahindra Thar Roxx Launched । अखेर महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित 5-डोर Mahindra Thar Roxx बाजारात लाँच केली आहे. हि SUV कार अवघ्या 12.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमती लाँच करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबरपासून महिंद्रा थार रॉक्सचे बुकिंग सुरू होणार असून दसऱ्यापासून या SUV ची डिलिव्हरी सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हंटल आहे.

लूक आणि डिझाईन – Mahindra Thar Roxx Launched

गाडीच्या लूक आणि डिझाईन बद्दल सांगायचं झाल्यास, महिंद्रा थार रॉक्समध्ये नवे ग्रिल, सी आकाराचे एलईडी डीआरएल, प्रोडेक्टर हेडलॅंप, गोलाकार फॉग लाइट, ड्युअल टोन एलॉय व्हील आणि रियर-डोर-माऊंटेड हॅंडल देण्यात आले आहे. आधीप्रमाणे यामध्ये रेक्टॅंग्युलर एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील देण्यात आले आहेत. मागील बाजूस, थार रॉक्समध्ये आयताकृती टेललाइट्स आहेत, जे त्याच्या ३ -DOOR मॉडेलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होते. गाडीच्या इंटेरिअर बाबत सांगायचं झाल्यास, तीन-दरवाजा मॉडेलपेक्षा या नव्या थारच्या केबिनमध्ये भरपूर फीचर्स पाहायला मिळतात. यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लेदरेट अपहोल्स्ट्रीसह हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हरमन कार्डन साउंड सिस्टीम आणि ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड कनेक्टिव्हिटीसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेशआहे. महिंद्रा थार रॉक्समध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. गाडीमध्ये लेवल-2 ADAS सूट देण्यात आलाय. यामध्ये 4 डिस्क ब्रेक, 6 एअरबॅग, TCS, TPMS आणि ESP ची सुविधा देण्यात आली आहे.

इंजिन –

महिंद्रा थार रॉक्समध्ये 2.0 लीटरचे 4 सिलेंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 160bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय 2.2 लीटर, 4 सिलिंडर, mHawk डीझेल इंजिनदेखील या suv कार मध्ये उपलब्ध आहे. जे 150bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सला जोडण्यात येईल. महिंद्राने अजून तरी मिड आणि टॉप व्हेरियंटचे इंजिन स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत. मात्र ते इंजिन अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता आहे आणि त्यात ऑटोमॅटिक आणि 4×4 चा पर्याय देखील असेल. (Mahindra Thar Roxx Launched)

किंमत किती?

कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, रियर व्हील ड्राइव्ह ऑप्शनमधील महिंद्र थार रॉक्स एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 12.99 लाख रुपये आहे तर डिझेल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे. महिंद्राची ही नवीन थार रॉक्स काळ्या आणि पांढऱ्या तसेच इतर आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.