अत्याचार नसून सर्वकाही सहमतीने झाले? पुणे अत्याचार प्रकरणात मोठे खुलासे

0
37
Pune rape case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरातील (Pune City) स्वारगेट बस स्थानकावर (Swarget Bus Stand) झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले आहेत. या प्रकरणातील आरोपीला काल मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तब्बल 72 तासांच्या शोध मोहिमेनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट गावात (Gunat Village) पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. महत्त्वाचे म्हणजे, आरोपीच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

गावकऱ्यांच्या मदतीने अटक

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक, ड्रोन आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. मात्र, त्याच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवणाऱ्या गुनाट गावातील नागरिकांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती पुरवली. अखेर, काल रात्री 1 वाजता गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गावकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटकेनंतर पोलिस कोठडीत नेल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, त्याने धक्कादायक दावा करत हा अत्याचार नसून सर्वकाही सहमतीने झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणांमध्ये अटक होण्याच्या भीतीने आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक आरोग्य चाचणीत आरोपीच्या मानेवर व्रण आढळून आले आहेत. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि गावकऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आरोपीला आत्महत्या करता आली नाही.

आरोपीला पकडण्यास उशीर

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनीही आरोपीला पकडण्यात उशीर झाल्याची कबुली दिली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपीची ओळख पटली होती. मात्र, तो गावात सापडत नव्हता. अखेर, तांत्रिक मदतीसह गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे त्याचा ठावठिकाणा मिळवण्यात यश आले. आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

गावकऱ्यांचा सत्कार व बक्षीस जाहीर

या कारवाईत गावकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने पोलिसांनी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आरोपीचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, गुनाट गावासाठी काही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.