हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण आला आहे. या सणानिमित्त यंदा तुम्ही बेकरीत न जातातच घरच्या घरी हेल्दी अशा कुकीज बनवू शकता. तसेच, या कुकीज तुम्ही कोणताही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मैदा न वापरता बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी बेकरीसारख्या कुकीज कश्या बनवायच्या.
साहित्य –
गव्हाचे पीठ
बारीक रवा
खोबऱ्याचा बारीक कीस
मीठ
साखर
वेलची पावडर
सुकामेवा
तूप
कुकीज बनवण्याची कृती –
कुकीज बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, खोबऱ्याचा कीस, मीठ, वेलची पावडर आणि सुकामेवा, साखर घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या.
मिश्रण एकत्र केलेल्या भांड्यात थोडेसे तूप घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
पुढे यामध्ये साखर आणि पाणी घाला. यानंतर पुन्हा सगळे पीठ हळूहळू एकजीव करून घ्या.
यानंतर या पिठाच्या तुम्हाला हव्या तशा पद्धतीने कुकीज बनवून घ्या.
आता एका कढईमध्ये तूप तापवून. या कुकीज बारीक गॅसवर तळून घ्या.
यानंतर कुकीज गरम असतानाच त्यावर थोडे सुकामेव्याचे काप आणि खोबरे घाला. आणि तुमच्या मुलांना खायला द्या.