उन्हाळ्यात घरीच तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन; चेहरा दिसेल फ्रेश आणि टवटवीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये, तसेच उन्हामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहोचू नये आपण वेगवेगळ्या सनस्क्रीन (Sunscreen Lotion) वापरायला सुरुवात करतो. परंतु अनेकवेळा या सनस्क्रीनमुळेच चेहऱ्यावरील तेज निघून जाते. यासह चेहरा लालसर दिसायला लागतो. याचे कारण असे की, बाजारातून विकत आणलेल्या प्रत्येक सनस्क्रीनमध्ये काही प्रमाणात केमिकल वापरलेले असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला इजा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला घरगुती सनस्क्रीन बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. याने तुमच्या चेहऱ्याला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

घरगुती सनस्क्रीन बनवण्याची पद्धत

आवश्यक साहित्य:

खोबरेल तेल 1/4 कप
शिया बटर १/४ कप
झिंक ऑक्साइड पावडर (नॉन-नॅनो) 2 टेस्पून
बीसवैक्स 1 टेस्पून
एसेंशियल तेलाचे 10 थेंब (सुगंधासाठी)

कृती

  • सर्वात प्रथम एका उकळत्या पाण्याच्या भांड्यावर एक झाकण ठेवून त्यावर खोबरेल तेल, शिया बटर आणि बीसवैक्स वितळून एकजीव करा.
  • पुढे ते पूर्णपणे थंड करून घ्या. यानंतर त्यात झिंक ऑक्साईड पावडर टाका आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
  • जर तुम्ही यामध्ये एसेंशियल तेलाचे थेंब टाकले असतील तर या मिश्रणाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी ही पेस्ट एका एअर टाईट डब्यात पॅक करा. आणि घरातून बाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावर आणि हातावर लावत जावा.