लाईफ फंडा । व्यक्तीचे विचार हे त्याला आयुष्याचा मार्ग दाखवत असतात. जसे विचार असतात तसे त्याचे आचार असतात. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आचार आणि विचार यांना खूप महत्त्व आहे. यात ‘विचार’ हे त्याला घडवण्यासाठी खूप महत्वाचे साधन आहे.
चांगल्या विचारांमुळेच व्यक्तीच्या जीवनात प्रगती, आनंद , सकारत्मक्ता व उत्साह नेहमी टिकून राहतो. माणूस हा विचारशील प्राणी जरी असला तरी , प्रत्येकाची वैचारिक पातळी ही वेगळी असते. बऱ्याच वेळा परिस्थिनुसार व्यक्तिचे विचार निर्माण होत असतात. गरीबाला जर श्रीमंत होण्याचा विचार आला तर तो अशक्य गोष्ट देखिल साध्या या विचाराने शक्य करू शकतो.
आजगायत जेवढे ही नवनवीन शोध लागले आहेत, ते फक्त या वैचारिक शक्ती मुळेच. त्यामुळे आपण जर आपल्या विचारांना योग्य दिशा दिल्यास आपली आजची परिस्थिति नक्की बदलेल. त्यामुळे मनातील नकारात्मक विचारांना काढून त्यात सकारात्मकता विचारांची पेरणी करा. स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, ते तुम्हाला नक्की बळ व प्रेरणा देतील.
Chan