हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात पैसा कमवण्याचा मार्ग म्हणून लोक नोकरीऐवजी बिजनेस हा पर्याय निवडताना दिसत आहेत. खास म्हणजे कमी काळामध्ये जास्त पैसा कसा कमवता येईल, यावर सर्वाधिक जोर दिला जात आहे. यामुळे आम्ही तुम्हाला अशी 1 बिजनेसची आयडिया देणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 5 वर्षांमध्ये श्रीमंत बनाल. या बिझनेसमध्ये तुम्हाला फक्त एका झाडाची लागवड करायची आहे आणि त्या लाकडाला बाजारात जाऊन विकायचे आहे. ज्यामुळे तुम्हाला बक्कळ नफा मिळेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मलबार कडुनिंब झाडाची (Malabar Neem Tree) लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. कारण की, मलबार कडुलिंबाचे लाकूड बाजारात चांगल्या किमतीमध्ये विकले जात आहेत. या झाडाच्या लाकडापासूनच माचिसच्या काड्या, खुर्च्या, टेबल, सोफा आणि इतर गोष्टी बनवल्या जातात. या झाडाची लागवड करून शेतकरी आज लाखो रुपये कमवत आहेत. परंतु हे झाड सामान्य कडुलिंबापेक्षा थोडे वेगळे आहे. याची लागवड देखील व्यवस्थित करावी लागते.
झाडाची लागवड
मलबार कडुलिंबाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते. यासाठी जास्त पाणी लागत नाही. मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याची बियाणे पेरणे चांगले मानले जाते. तुम्ही मलबार कडुनिंबाची 4 एकरात 5000 झाडे लावू शकता. या झाडाची याची रोपे लावल्याबरोबर 2 वर्षांत ती 40 फूट उंच वाढतात. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील शेतकरी याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. महत्वाचे म्हणजे, या झाडाचे लाकूड 5 वर्षांनंतर प्लायवूड बनवण्यासाठी आणि 8 वर्षांनंतर ते फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते.
नफा किती मिळेल??
लक्षात घ्या की, मलबार कडुलिंबाचे लाकूड 8 वर्षांनंतर विकता येते. तुम्ही 4 एकरात लागवड करून 50 लाख रुपये सहज कमवू शकता. याच्या एका झाडाचे वजन दीड ते दोन टन असते. ते बाजारात किमान 500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जाते. म्हणजेच एक रोप 6000-7000 रुपयांना विकले तरी शेतकऱ्यांना लाखो रुपये सहज मिळू शकतात. थोडक्यात, हे झाड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.