हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या आर्थिक राजधानीतील उच्चभ्रू वस्तीचा, मोठे उद्योजक, व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल… राजभवन, सह्याद्री अतिथीगृह , पेडर रोड ते शहरी श्रीमंत झगमगाट पाहायचा असेल तर साउथ बॉम्बे मधील मलबार हिल हा सेंटर पॉईंट ठरतो… पण अशा या हाय फाय मतदारसंघात राजकारण टिकवून ठेवून तशी अवघड गोष्ट… पण तब्बल पाच टर्म, तीस वर्ष, एकाच पक्षातून ग्लॅमरस मलबार हिल सारख्या मतदार संघात आमदार म्हणून… मंत्री म्हणून… भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचा दबदबा कायम आहे… पण शिवसेनेने ती एक चूक केली नसती, तर या साउथ बॉम्बेच्या मलबार हिलवर आजही भगवा फडकला असता… नेमके शिवसेनेने केलेली ती चूक भाजपच्या कशा पथ्यावर पडली? मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो? मंगल प्रभात लोढा यांच्या विजयाचा वारू यंदा तरी ठाकरे रोखू शकतील का? आणि मलबार हिलच्या जनतेचा सध्याचा ट्रेंड कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने दिसतोय? त्याचाच हा आढावा…
1995 साली बी. ए देसाई यांना हरवून पहिल्यांदा मंगलप्रभात लोढा आमदार झाले. 1995 पासून ते 2009 पर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली. 2014 साली भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली. पण तरीही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत मलबार हिल इज इक्वल टू मंगल प्रभात लोढा अस जणू नवीन राजकीय समीकरणच सेट केलं…तसं पाहायला गेलं तर शिवसेनेलाही युतीच्या काळामध्ये या मतदारसंघावर क्लेम करण्याचा एक चान्स आला होता… पण तो ठाकरेंनी हाताने घालवला… तर झालं असं होतं की गिरगाव, ग्रँड रोड, ताडदेव आणि आजूबाजूच्या परिसरातून बनलेला ऑपेरा हाऊस मतदारसंघ 2009 ला मतदार संघाच्या पुनर्रचनेत मलबार हिलमध्ये मर्ज झाला… या ऑपेरा हाऊस मतदार संघावर कायम शिवसेनेचाच भगवा फडकत होता… त्यामुळे 2009 ला मुंबईतील पक्षाची स्ट्रॉंग पोझिशन पाहता… मुंबईवरील वर्चस्व पाहता… युतीमध्ये ही जागा खेचून आणण्याची संधी शिवसेनेला होती… पण मातोश्रीने शिवसेनेतीलच स्थानिक नेत्यांचा विरोध जुगारून मलबार हिल मतदार संघ भाजपासाठी सोडला… आणि स्वतःच्या हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेतला…
कारण यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या वर्चस्वाच्या राजकारणाला आणखीन धार दिली… म्हणूनच 2014 ला जेव्हा युतीत काडीमोड होत स्वतंत्र निवडणूक लढली गेली…. तेव्हा देखील शिवसेनेच्या भगव्यावर भारी पडत मंगल प्रभात लोढा यांनीच मलबार हिलवर भाजपचा झेंडा फडकवला… यानंतर राज्यात भाजपची सत्ता येणं आणि मुंबईतून शिवसेना बॅक फुटला जाणं यामुळे आपसूकच मंगल प्रभात लोढा हे नाव मलबार हिलमध्ये आणखीन स्ट्रॉंग बनत गेलं… आणि 2019 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हिरा देवासी यांना धूळ चारत लोढा सलग पाचव्यांदा आमदार झाले… आणि महायुती सरकारमध्ये मंत्रीपदावर ठाणही मांडून बसले… तसं पाहायचं झालं तर एक राजकारणी सोडून राज्यातील उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक, उद्योगपती म्हणूनही लोढा यांचं नाव परिचित आहे… ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट या एका रिपोर्टनुसार लोढा यांच्या संपत्तीचा आकडा तब्बल 31,960 कोटी इतका भरभक्कम होता… याच मनी, मसल आणि भाजपसोबत असल्यामुळे पॉलिटिकल पॉवरमुळे मंगल प्रभात लोढा यांचा पराभव करनच सोडा… पण त्यांना विरोधकही सापडणंही तशी ठाकरे गटासाठी अडचणीची गोष्ट असणार आहे…
उदाहरणच घ्यायचं झालं तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीच वार होतं… अगदी साउथ बॉम्बे सारख्या हायफाय मतदारसंघातही ठाकरे गटाचाच खासदार झाला… पण मलबार हिलने मात्र आपलं लीड हे महायुतीच्या म्हणजेच अप्रत्यक्षपणे मंगल प्रभात लोढा यांच्याच पारड्यात टाकलं… थोडक्यात आकडा सांगतोय मलबार हिलमधून 2024 ला लोढा आरामात आमदारकीचा सिक्सर मारतायत…मलबार हिल परिसरातील घसरलेला मराठी टक्का, मराठी मतदारांची वाढलेली संख्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाढलेली ताकद आणि प्रमोद नवलकर, चंद्रकांत पडवळ, विलास अवचट यानंतर मतदार संघात लोढांच्या तोडीचा राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या तगडा उमेदवार सध्या तरी ठाकरे आणि काँग्रेसकडे दिसत नाही… त्यामुळे मलबार हिलमध्ये पुन्हा लोढा जिंकून आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसणार आहे… त्यामुळे शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना… असं जे म्हटलं जातं त्यातून मलबार हीलला वगळावं लागतं… कारण मनी, मसल आणि पॉलिटिकल पॉवर या सगळ्याच बाबतीत लोढा यांना अप्पर हॅण्ड मिळतो… बाकी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मलबार हीलमधून कोण आमदार होतंय? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.