व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Karad News : मलकापूर, कोयनावसाहत येथील पाणीपुरवठा बंद

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर शहरातील व कोयनावसाहत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व २४x७ नळपाणीपुरवठा योजना ३० मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यापुर्वी सेटलिंग टँक स्वच्छता करणेकरीता २४x७ नळपाणीपुरवठा योजनेतुन उद्या मंगळवार दिनांक ३०/०५/२०२३ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदरचे काम पूर्ण झाले नंतर पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी साठवुन त्याचा काटकसरीने वापर करुन सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात मान्सून ८ जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, रस्त्याकडेची गटारे साफसफाई आदी कामे जलदगतीने सुरु आहेत.