हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लोकांना उन्हाळ्याचा हंगाम देखील आवडतो, कारण यावेळी आंबे खायला मिळतात. आंब्याच्या बागेत जाऊन ताजे आंबे खाण्याचा आनंद देखील तुम्ही घेतला असेल. आंब्याच्या हंगामातही अनेक ठिकाणी आंबा सणांचे आयोजन देखील केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या आंब्यांना प्राधान्य दिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहोत जे एकाच झाडावर विविध प्रकारचे आंबे तयार करतात.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौजवळ मलिहाबाद येथे कलीमउल्लाह खान यांना ‘मॅंगो मॅन’ म्हणून देखील ओळखले जाते. कालीमउल्लह खान यांनी असे आंब्याचे झाड तयार केले आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या रंगाचे पाने आणि आंबे सापडतील. या झाडावर तुम्हाला दशहरी, लंगडा, हिमसागर, अल्फोन्सो असे विविध प्रकारचे आंबे मिळतील. मलिहाबाद उत्तर भारतातील आंब्यांसाठीही ओळखला जातो. येथे सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड केली जाते. येथील आंब्याचा इतिहास शेकडो वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.
आंब्याची लागवड कशी सुरू झाली:
कालीमउल्लाह खान आपल्या मुलासह 22 एकर जागेवर आंब्याच्या लागवडीची देखभाल करतात. शाळा सोडल्यानंतर त्यांनी आंब्याच्या बागेतच काम करण्याचे ठरविले होते. काही वर्षांनंतर त्याने त्याच्या एका मित्राकडे गुलाबाची क्रॉसब्रेड वनस्पती पाहिली. एकाच रोपावर वेगवेगळ्या रंगाचे गुलाब पाहिल्यानंतर त्यांनी आंब्यांचा विचार केला. आणि आंब्यावर तो प्रयोग केला. आता एकाच झाडावर ते 300 हून अधिक प्रकारातील आंबे पिकवतात.