कर्जमाफीच्या पैशांचं तुम्ही काय करता? कृषिमंत्र्यांचा अजब सवाल

manikrao kokate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होते. मात्र सरकार येऊन ५ महिने झाले तरीही शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळलेल नाही. याच मुद्द्यावरून एका शेतकऱ्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) याना विचारलं असता कर्जमाफीच्या पैशांचं तुम्ही काय करता? असा उलट सवाल कोकाटे यांनी केला. . तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक येथे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला. त्यावर उत्तर देताना कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा उलट सवाल केला. 5 ते 10 वर्ष वाट बघता तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. विम्याचे पैसे द्या म्हणतात आणि पैसे आले की साखरपुडे कर, लग्न कर, असं करता असंही ते शेतकऱ्यांना म्हणाले.

खरं तर कृषीमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासूनच कोकाटे वेगवेगळ्या वादात सापडले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिलीय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. एकवेळ1500 रुपयाचे आता 2100 रुपये पण दिली जातील. पण ते पुढच्या निवडणूकीच्या तोंडावर दिले जातील, असे म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या दिल्या जाणाऱ्या पैशावरून देखील महायुती सरकारला टोला लगावला.