Manikrao Kokate Rummy : माणिकराव कोकाटे तब्बल इतका वेळ रम्मी खेळले; चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा

Manikrao Kokate Rummy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manikrao Kokate Rummy। भर विधिमंडळ सभागृहात रम्मीचा डाव खेळल्याने आणि त्याचे विडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. मला रमी खेळता येत नाही, मी फक्त रमीची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव माणिकराव कोकाटेंनी केली होती. मात्र आता विधिमंडळ चौकशी समितीच्या अहवालात मात्र वेगळीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. अधिवेश चालू असताना माणिकराव कोकाटे तब्बल १८ ते २२ मिनिटे रम्मी खेळत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार – Manikrao Kokate Rummy

खरं तर माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण (Manikrao Kokate Rummy) सुरुवातीपासूनच रोहित पवारांनी उचलून धरलं आहे. कोकाटे यांचे रम्मी खेळतानाचे विडिओ सुद्धा रोहित पवारांनी यापूर्वी जनतेसमोर आणले होते. आज तर त्यांनी विधिमंडळ चौकशी समितीचा दाखला देत माणिकराव कोकाटेंवर नवा बॉम्ब टाकला आहे. रोहित पवारांनी ट्विट करत म्हंटल, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवालही रोहित पवारांनी केला. तसेच हॅशटॅग पत्ते खेळणारा मंत्री असं म्हणत रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे याना डिवचलं सुद्धा आहे.

दरम्यान यापूर्वीही रोहित पवारांनी कोकाटे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे सभागृहात बसलेले असताना मोबाईलवर जंगली रम्मी खेळत (Manikrao Kokate Rummy) असल्याचे पाहायला मिळत होते. या व्हिडीओला रोहित पवारांनी कॅप्शन देत जंगलीरमीपेआओना_महाराज…! असे म्हटले होते. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवाल रोहित पवारांनी केला होता.