नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युवा आघाडीपटू मनीषा कल्याण (manisha kalyan) ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली आहे. ती (manisha kalyan) सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसी संघाकडून खेळली आहे. मनीषा कल्याणने (manisha kalyan) या सामन्यात मारिलेना जॉर्जिओयूच्या जागी 60व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या लढतीत अपोलोन संघाने लॅट्वियातील आघाडीचा क्लब एसएफके रिगाला 3-0 असे पराभूत केले. मनीषाने (manisha kalyan) राष्ट्रीय संघासह भारतीय महिला लीगमध्ये गोकुलम केरळ संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या जोरावर तिला 2021-22 वर्षांसाठी FIFF सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मागच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ब्राझील संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यात मनीषाने (manisha kalyan) गोल करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. विदेशी क्लबकडून कराराबद्ध करण्यात आलेली मनीषा ही दुसरी भारतीय खेळाडू आहे. याआधी डांगमेइ ग्रेसला उझबेकिस्तानच्या एफसी नसाफ संघाने करारबद्ध केले होते.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!