हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आज पुनः एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान केली होती. महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी असच बेताल विधान केलं होत.
मनोहर भिडे हे पुण्यात असून त्यांनी म्हंटल कि, वटसावित्रीच्या पूजेला साडी घातलेल्या महिलांनी जावं, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायला येतं. वटवाघळाला येतं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. ह्या व्रताची पथ्य आहेत, त्यामुळे साडी घातलेल्या महिलांनी पूजेला जावं असे मनोहर भिडे म्हणाले आहेत.
महात्मा गांधींविषयी वादग्रस्त विधान –
यापूर्वी मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होते. महात्मा गांधीं यांचे खरे वडील मोहनदास नसून ते मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत असं भिडे यांनी म्हंटल होते. तसेच त्यांनी आपलं विधान पटवून देण्यासाठी वेगळाच दाखला दिला. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत असं वादग्रस्त विधान भिडे यांनी केलं होते.