Manohar Joshi Death : शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. आज पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खरं तर 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यावेळी मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

मनोहर जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. जोशी यांच्या रूपाने कडवट शिवसैनिक हरपला आहे.