Satara News : उत्तरेत बाळासाहेब पाटलांविरोधात भाजपच्या मनोज घोरपडेंनी दंड थोपटले; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील नऊ बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला खूप महत्व आहे. कारण या निवडणुकीत दक्षिणेतील भाजप नेत्यामध्ये व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाली आहे. हि उत्तरेतील भाजप नेत्यांच्या पचनी न पडल्याचे दिसते. यावरून उत्तरेतील भाजप नेते मनोज घोरपडे यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. “ज्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील उतरतील तिथे यांच्या विरोधात आम्ही असणार असल्याचे घोरपडे यांनी म्हंटले आहे.

कराड बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते उदय पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता उत्तरेतील भाजप नेते मनोज घोरपडे व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी घोरपडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उत्तरेतील आम्ही भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये जे काही आमचे ठरले आहे कि अँटी बाळासाहेब. या भूमिकेच्या माध्यमातून उदयसिह पाटील यांच्या पॅनेलला आम्ही सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक पक्ष चिन्हावर होत नाहीये त्यामुळे अतुल भोसलेंनी त्यांच्या सोयीची भूमिका घेतली आहे. आम्हीपण आमची अँटी बाळासाहेब ही भूमिका सर्वांसमोर आणली आहे. शेवटपर्यंत आमचा बाळासाहेब पाटील यांना विरोधच राहील दरम्यान आमच्यात आणि अतुल भोसले यांच्यात कोणताही विसंवाद नाही, असे घोरपडे यांनी सांगितले.

कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपमधील एकाच पक्षातील नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका देखील या ठिकाणी दिसून आल्या आहेत. भाजपाच्या कराड उत्तर मतदार संघातील नेत्यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या विरोधात काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे घोरपडीच्या भूमिकेमुळे स्पष्ट झाले आहे.