कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय; मनोज घोरपडेंची बाळासाहेब पाटलांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय आहे. ते राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते आणि गेली २५ वर्ष कराड उत्तर चे नेतृत्व करतायत परंतु अजूनही त्यांना पाणी, रस्ता, वीज, ह्या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. त्यामुळे कराड उत्तर मध्ये आता बदल हवा आहे असं म्हणत भाजपा नेते मा. मनोज दादा घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

मौजे पिंपरी ता. कोरेगाव येथे मा.सुरेश भोसले यांच्या माध्यमातून दिड कोटी रुपये विविध विकास कामांचे भुमिपूजन मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख मा जयवंत शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मा. दादामहाराज गोरेगावंकर ,मा. विक्रमशील बाबा कदम, मा. भिमराव काका पाटील, मा. वासुदेव माने काका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटलांवर चांगलंच तोंडसुख घेतलं.

मनोज घोरपडे म्हणाले, आज संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदार संघात फिरत असताना प्रत्येक गावात अजून रस्ते, पाणी यासाठी जनता झटत असून आता मतदाराच्या तोंडी एकच वाक्य असते ते म्हणजे कराड उत्तर मध्ये आता बदल हवा. राज्यात आघाडी सरकार असताना कोणतीही कामे झाली नाहीत. कराड उत्तरचे आमदार हे राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते आणि गेली २५ वर्ष कराड उत्तरचे नेतृत्व करतायत तरी त्यांना अजून पाणी, रस्ता, वीज, ह्या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. म्हणून आज राज्यात युती सरकार आल्या पासून हे लोक आपल्या सगळ्यांकडे येत असून त्यांना आपल्या सरकार कडून न्याय मिळत आहे.

लोकांना प्यायला पाणी नाही, गावात जायला रस्ते नाहीत ही अवस्था या आमदारांच्या उदासीनतेमुळे असून आता गावो गावी लोक म्हणतायत कराड उत्तर मध्ये बदल केला पाहिजे . येत्या २०२४ ला महायुती च्या माध्यमातून कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे कारण ही लढाई आता जनतेने हातात घेतली आहे.असं म्हणत मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले आहे.

यावेळी पै. जालिंदर गोडस, सौ. शैलजा पवार.सरपंच पिंपरी श्री सुनिल राजेभोसले ,श्री सुरेशभाऊ (बापू ) , तात्यासाहेब साबळे , ॲड. अशोकराव पवार , विष्णूपंत कणसे , शिवाजीराव निकम , आप्पासो पवार , युवराज घाडगे , नानासो पवार , बळवंत कणसे गुरुजी , नारायण पवार , राजेंद्र भोसले, लालासो भोसले , ऋषीकेश तुपे, नवनाथ पवार , निलेश तुपे , अविनाश जाधव , भिमराव भोसले, शिवाजीराव पवार , धनाजी घाडगे , प्रविण कदम , राजेंद्र गोरे संरपंच उपसरपंच ग्रा. प. पिंपरी व सर्व सदस्य तसेच पिंपरी वि.का. सेवा सोसायटी , चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व ग्रामस्थ् भाजप व शिवसेना तमाम कार्येकर्ते उपस्थित होते. सूत्र संचालन तात्या सबले यांनी तर आभार सुरेश भोसले बापू यांनी केले.