मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; GR मधील ‘त्या’ 2 शब्दांत सुधारणा करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची सोय करावी, तसेच वंशावळ हा शब्द काढून टाकावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आम्ही सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत करतो, परंतु वंशावळीचे दस्तावेज अनेंकांकडे नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्का सुद्धा फायदा नाही. तुमच्या निर्णयात सुधारणा करा, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. तोपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन सुरु ठेवतो” त्याचबरोबर, राज्य सरकारने आणलेल्या जीआरचे मराठा समाजाने स्वागत केले आहे. परंतु त्यातून फक्त वंशावळ हा शब्द काढून टाका अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.

राज्य सरकारने सांगितलेल्या सर्व सुधारणा केल्यानंतर उपोषण मागे घेतले जाईल असे मनोज जरांगे यांनी म्हणले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार JR मधून वंशावळ काढून टाकण्याबाबत काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत ठोस पावले उचलताना दिसत आहे.

बुधवारी, पार पडलेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत मनोज जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्राबाबत मागणीचा विचार करण्यात आला. कुणबी प्रमाणपत्र मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. ही समिती हैदराबादला जाऊन कुणबींच्या नोंदी तपासणार आहे. त्यानंतर पाच ते सहा सदस्यांची ही समिती 10 दिवसांत अहवाल सादर करेल.