मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास ‘संघर्षयोद्धा’ मधून उलघडणार; चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचा आवाज बनत पेटून उठलेले मनोज जरांगे पाटील संपूर्ण देशभरा चर्चेचा विषय ठरले आहेत. सध्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे जरांगे पाटलांचा ताफा न्याय मागण्यासाठी मुंबईला रवाना झाला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव संघर्षयोद्धा असे असणार आहे.

आताच्या घडीला राज्य सरकारच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन मनोज जरांगे मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकांना मराठा बांधवांकडून देखील तितकाच पाठींबा दिला जात आहे. अशातच त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या संघर्ष योद्धा या चित्रपटाच्या शूटिंगला जालन्यातील अंतरवाली सराटी येथून सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये मनोज जरांगे यांची भूमिका रोहन पाटील साकारणार आहे. तसेच,
शिवाजी दोलताडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

https://www.instagram.com/p/C2RhkiOodto/?igsh=NGU0NWg1YzJhOXBv

चित्रपटात काय दाखवले जाणार?

संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून म्हणून मनोज जरांगे यांचा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. तसेच, अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मनोज जरांगे यांचे आंदोलन, या आंदोलनामध्ये झालेला लाठीचार्ज, सरकारने घेतलेल्या भूमिका आणि मनोज जरांगे यांचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटांमध्ये अधोरेखित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या सुरू झालेल्या चित्रीकरणासाठी शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील, अभिनेता निर्माते दिग्दर्शक आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

चित्रपट रिलीज कधी होणार?

मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्ष योद्धा हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण सिनेमागृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाला आतापासूनच लोकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. तसेच, मनोज जरांगे यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दाखवली आहे.