Manorama Khedkar Arrested : पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Manorama Khedkar Arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar Arrested) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होती. अखेर आज महाड येथून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होत्या. अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. त्यांचा फोन सुद्धा बंद होता. यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. अखेर आज पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक (Manorama Khedkar Arrested) केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. आजच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

नेमकं काय आहे प्रकरण? Manorama Khedkar Arrested

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना दमदाटी करत धमकावलं होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्या फरार झाल्याने त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर आज पुणे ग्रामीण पोलिसानी त्यांना बेड्या ठोकल्या.