रेशी मशरूम खाण्याचे आहेत अनेक फायदे; दूर होतात ‘या’ सर्व समस्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सहसा आपल्याकडे काही तुरळकच लोक मशरूम खातात. या मशरूममध्ये देखील अनेक विविध प्रकार आढळून येतात. यातील एक सर्वात महत्त्वाचा प्रकार असतो तो म्हणजे रेशी मशरूम (Reishi Mushrooms). या रेशी मशरूमचा वापर चीनमध्ये औषधी फायद्यांसाठी केला जातो. कारण, या मशरूमचे सेवन करणे सर्वात आरोग्यदायी मानले जाते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला रेशी मशरूम खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

ताणतणाव कमी होणे – रेशी मशरूम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे मशरूम खाल्ल्यास ताणतणावाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाते. या मशरूममध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे मन शांत राहते. पचन इंद्रिये व्यवस्थित काम करतात.

त्वचेसाठी फायदेशीर असते – पॉलिसेकेराइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि ट्रायटरपीन्स असे विविध घटक रेशी मशरूम मध्ये असतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर तेज येते. यासह त्वचेसंबंधित असलेल्या समस्या दूर होतात.

शांत झोप मिळते – संशोधनातून आढळून आले आहे की मशरूम खाल्ल्यामुळे मन आणि मेंदू शांत राहतो. तसेच मेंदूवरील ताण कमी होतो. या कारणामुळे मशरूम खाणाऱ्या व्यक्तीला शांत झोप लागते. तसेच झोपेसंबंधित असलेल्या समस्या दूर होतात.

कर्करोग दूर राहतो – रेशी मशरूममध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आढळून आले आहेत. या मशरूममध्ये काही रेणू असतात ज्यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. हे मशरूम कोलोरेक्टल कर्करोगाशी देखील लढण्याची ताकद ठेवते.

साखरेचे प्रमाण कमी होते- अभ्यासातून समोर आले आहे की, रेशी मशरूम हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. तसेच मशरूम खाल्ल्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही. मशरूममध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो.