इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंडच होता 2019 वर्ल्डकप चॅम्पियन; अंपायरने मान्य केली ‘ती’ चूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत (Cricket World Cup 2019) आमच्याकडून चूक झाली आणि त्यामुळेच इंग्लंडचा संघ चॅम्पियन झाला, अन्यथा अंतिम सामन्यात न्यूझीलंडचाच एक धावाने विजय झाला असता अशी कबुली पंच मराइस इरास्मस (Marais Erasmus) यांनी दिली आहे. तसेच दोन्ही अंपायर कडून नेमकी कुठे चूक झाली हे सुद्धा इरास्मस यांनी सविस्तरपणे सांगितलं.

2019 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG Vs NZ) आमनेसामने होते. अतिशय रोमांचक झालेला हा सामना सुपर ओव्हर मध्ये पोचला होता, मात्र सुपर ओव्हर सुद्धा टाय झाल्याने अखेर बाऊंड्रीच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. मात्र तत्पूर्वी इंग्लंडच्या डावाच्या 50 व्या षटकात चौथ्या चेंडूवर पंच इरास्मस आणि कुमार धर्मसेना यांनी 5 ऐवजी 6 धावा दिल्या नसत्या तर सुपर ओव्हर ची गरज लागलीच नसती आणि न्यूझीलंडचा संघ एका धावेने जिंकला असता. मात्र दोन्ही अंपायरच्या लक्षात त्यांची चूक आली नाही. इरास्मस यांनी म्हंटल कि, दुसऱ्या दिवशी सकाळी (फायनलनंतर) मी नाश्ता करण्यासाठी जाताना माझ्या हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळी कुमार धर्मसेनाने त्याचा दरवाजा उघडला आणि तो म्हणाला, ‘तुम्ही पाहिलं का की आमच्याकडून मोठी चूक झाली आहे का? ‘ तेव्हा मला याची माहिती मिळाली.

अंतिम ओव्हर मध्ये नेमकं काय घडलं??

खरं तर अंतिम सामन्यात इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. तिसऱ्या चेंडूवर मात्र बेन स्टोक्सने षटकार ठोकला. त्यानंतर आला चौथा चेंडू.. इरास्मस ज्या चेंडूबद्दल बोलत आहे तो हाच चौथा चेंडू होता. या चेंडूवर स्टोक्सने डीप मिड-विकेटच्या दिशेने शॉट खेळला त्यावेळी धाव काढत असताना क्षेत्ररक्षकाच्या थ्रोवर चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागला आणि तसाच बाऊंड्रीवर गेला आणि पंचानी ६ धावा दिल्या, मात्र त्या क्षणी दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केलं नव्हतं त्यामुळे ६ ऐवजी ५ धावा द्यायला हव्या होत्या. परंतु दोन्ही अंपायरच्या लक्ष्यात ही गोष्ट आली नाही आणि न्यूझीलंडचा पराभव झाला, अन्यथा इंग्लंडने एका धावेने सामना गमावला असता