मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाने मराठा समाजाला (Maratha Community) शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. विशेष अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. हा मसुदा आज विशेष अधिवेशनामध्ये सादर केला जाणार आहे. आता थोड्या वेळामध्येच विशेष अधिवेशनाला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागून राहिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनामध्येच राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालातून स्पष्ट होईल की, राज्यामध्ये किती टक्के मराठे सामाजिक व आर्थिकद़ृष्ट्या मागास आहेत. यातूनच पुढे ठरवले जाईल की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे की नाही. या कारणामुळे आजचे हे अधिवेशन मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, तसेच, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची अधिसूचना अधिवेशनात जारी करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या यातील किती मागण्या सरकार मान्य करतील हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.