सातासमुद्रापार मराठ्यांचा डंका!! भगवे झेंडे घेऊन शिवरायांच्या मावळ्यांचा Calgary stampede 2023 मध्ये सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठा मैदानी शो मानला जाणारा कॅल्गरी स्टॅम्पेड हा दहा दिवसांचा कार्यक्रम यंदा ७ जुलै पासून सुरु झाला असून दरवर्षी तब्बल १० दिवस चालतो. कॅनडामधील या वर्षीच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडवेळी तब्बल 300,000 हून अधिक लोक रस्त्यावर रांगेत उभे होते. विशेष म्हणजे यंदाच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडमध्ये भगवा झेंडे घेऊन मराठा समाज सहभागी झाला आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता.

आपण या व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकता कि अस्सल मराठमोळ्या वेशात मराठा समाजाचे तरुण तरुणी रस्त्यावर उतरले आहेत. महिलांनी नववारी साडी आणि पुरुषांनी कुर्ता आणि डोक्यावर फेटा घालून आपली मराठी परंपरा सातासमुद्रापार सुद्धा जपलेली दिसत आहेत. झान्झ आणि लेजीम पथकाने कॅनडा मधील नागरिकांचे लक्ष्य वेधून घेतलं आहे. सर्वांच्या हातात भगवा आणि भारताचा तिरंगा पाहायला मिळत असून जय हिंद च्या घोषणाबाजी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत आहे. ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे वातावरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कॅलगरी स्टॅम्पेड हा उत्सव कॅलगरी,अल्बर्टा , कॅनडा येथे 1923 पासून दरवर्षी आयोजित केला जातो. दरवर्षी जुलैमध्ये आयोजित करण्यात येणार हा हा ओल्ड वेस्टचा 10 दिवसांचा रंगीबेरंगी उत्सव आहे ज्यामध्ये अनेक रोडिओ इव्हेंट्स, वाद्य प्रदर्शन, एक परेड आणि इतर उत्सव यांचा समावेश आहे. याठिकाणी दरवर्षी एक दशलक्ष लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. यंदा 7 जुलै रोजी म्हणजेच पहिल्याच दिवशी तब्बल 164,939 लोकांनी या उत्सवाला रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती.