पुणे | मराठा क्रांति मोर्चाने महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठिकठिकाणी शिस्तप्रिय पद्धतिने आंदोलन केले. मात्र आॅगस्ट ९ रोजी झालेल्या पुणे येथील आंदोलानादरन्यान चाकण हिंसाचार प्रकरण घडले. यात बाह्यशक्तिनी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. चाकण येथील हिंसाचारात सामिल असलेल्या बाह्यशक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्याकडून करण्यात आली आहे. आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी राजेन्द्र कोंढरे शांताराम कुंजीर यांनी केली.
मराठा क्रांति मोर्चा, पुणे जिल्हा च्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे –
१) मराठा समाजास कायदेशीर आरक्षण मिळाले पाहिजे
२) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयमाच्या कायद्याचा सरास होणारा गैरवापरथांबवावा व योग्य ती दूरुस्ती करावी
३) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ति व शेतीमालास हमीभाव मिळावा
४) अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे
५) मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतिकरण व मराठा समाजाची , महामानवांची बदनामी थांबवणे
६) अल्पभूधारक शेतकरी व ६ लाखांपेक्षा उत्पन्न कमी असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात
७) प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहिर केलेले ५०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करावी.