Maratha Reservation : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

Maratha Reservation Eknath Shinde (1)

Maratha Reservation : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंद नसणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील विधान केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते.

जुन्या कुणबी नोदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ नाही – Maratha Reservation

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्व्हे सुपूर्द केला. मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सांगितलं होतं. ते काम केलं त्याबद्दल आम्ही आयोगाचे अभिनंदन करतो. .या अहवालासंदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल. यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात येणार आहे. या अहवालांनुसार, जुन्या कुणबी नोदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण (Maratha Reservation) मिळेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने कुठलंही आंदोलन करण्याची गरज नव्हती, मनोज जरांगेंची आंदोलनाची भूमिका घेणं उचित नाही. असं सांगत जरांगे यांनी आरक्षण मागे घ्यावं असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.