हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आज पासून मराठा मूक मोर्चाला कोल्हापुरातून सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखने साथ दिली आहे. तेही आजच्या या आंदोलनात सहभागी झाले आहेत ते कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या बरोबरच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज सतेज उर्फ बंटी पाटील तसेच खासदार धैर्यशील माने,हे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.
पावसाची ही आंदोलनाला उपस्थिती
हे आंदोलन सुरू असतानाच पावसाने देखील या आंदोलनाला हजेरी लावली आणि या आंदोलनाचा हा पाऊस साक्षीदार ठरलाय. भर पावसात संभाजीराजे, मालोजीराजे, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते खाली बसले आहेत. आज पहाटेपासूनच पावसाने शहरात हजेरी लावली. आज सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहु महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान यापूर्वी संभाजीराजे यांनी हे मूक आंदोलन असणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत ते बोलणार नाही. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे जनतेला संबोधित करून आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबद्दल भूमिका जाहीर करतील.