ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होते. एक सोज्ज्वळ अभिनेत्री अशी त्यांची कायम ओळख राहिली. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे

२०२० मध्ये सीमा देव यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर सीमा देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांनी आपल्या पाहिल्याच चित्रपटात रमेश देव यांच्यासोबत काम केलं होते. तेथूनच दोघांची जोडी सुपरहिट ठरली. यानंतर रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं. प्रेक्षकांना सुद्धा ही जोडी चांगलीस पसंत पडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं.