हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Bhasha Gaurav Din) आज दिनांक २७ फेब्रुवारी. अर्थात आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ आहे. आजचा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि देशातील अनेक भागांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. कारण देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात मराठी भाषिक लोक राहतात. जे आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आवर्जून आजचा दिवस उत्साहात साजरा करतात. या मागचा एक मुख्य हेतू असा की, ‘मराठी भाषेचा गौरव करणे आणि मराठी भाषेतील साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करणे’.
आजच्या दिवसाबाबत एक खास गोष्ट सांगायची म्हणजे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे आणि याच दिवशी दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. त्याचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज
मराठी साहित्यात अनेक लेखक, कवी, कथाकारांचा आवर्जून उल्लेख केला जात .त्यांपैकी एक म्हणजे मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर. ज्यांना ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने आपण ओळखतो. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला होता. त्यांनी मराठी भाषेतून विविध प्रकारचे साहित्य दिले. (Marathi Bhasha Gaurav Din)
ते एक प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांविषयी विविध प्रकारचे मात्र विपुल लेखन केले आहे. त्यांच्या लेखणीतून निर्मिती झालेले साहित्य हे भारतीय साहित्यातील उत्कृष्ट साहित्य आहे. त्यांचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे. (Marathi Bhasha Gaurav Din) १० मार्च १९९९ मध्ये कुसुमाग्रज यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मात्र आजही त्यांचे साहित्य अनेक वाचकांसाठी प्रेरणादायी आहे.
कुसुमाग्रजांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din)
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेसाठी अत्यंत मोठे योगदान दिले आहे. केवळ मराठी साहित्य नव्हे तर रंगभूमीसाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे. जे अजरामर आहे. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या जयंतीदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी दिवशी २०१३ सालापासून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांना १९९१ मध्ये पद्मभूषणसह इतर अनेक राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. आजही त्यांचे साहित्य वाचकांसाठी पर्वणी आहे.
मराठी भाषा देशातील चौथ्या क्रमांकावर
मराठी ही अभिजात भाषा महाराष्ट्राची राजभाषा म्हणून ओळखली जाते. २०११ साली एक सर्वे करण्यात आला होता. ज्यामध्ये हिंदी, बंगाली, तेलुगू या भाषांनंतर संपूर्ण देशात मराठी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे लक्षात आले. (Marathi Bhasha Gaurav Din) यानुसार हिंदी, बंगाली. तेलुगू नंतर चौथ्या क्रमांकावर मराठी भाषेचे स्थान निश्चित झाले. हे झालं देशाचं तर जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्येसुद्धा मराठी भाषेचा समावेश आहे. यामध्ये मराठी भाषा १९ व्या क्रमांकावर आहे.
आपली भाषा आपली जबाबदारी
आपली मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. मराठी भाषेतील शाब्दिक गंमत मनोरंजन देखील करते आणि ज्ञानात भरदेखील टाकते. त्यामुळे आपल्या भाषेचा वारसा जपण्याची जबाबदारी मोठी आहे. (Marathi Bhasha Gaurav Din) मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या भाषेचे जतन करणे, संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या मराठी भाषेचा वारसा जपण्यासोबत सर्वांनी मराठी भाषेच्या विकासालादेखील प्राधान्य देणे गरजेचे आहे.