ठाकरेंचं बळ वाढलं; मराठी मुस्लिम सेवा संघाचाही पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली तरी त्यांना मोठी सहानभूती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी उद्धव ठाकरे याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातच आता मराठी मुस्लिम सेवा संघानेही उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचं बळ वाढलं आहे.

मुंबई, मराठवाडा, कोकण येथील सक्रिय मराठी मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनीच खरं हिंदुत्व जपलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, अखंडतेसाठी आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत आहोत असं मराठी मुस्लिम सेवा संघाने म्हंटल. यापूर्वीही अनेक संघटनानी उद्धव ठाकरेंचा पाठिंबा दिल्याचे आपण पहिले आहे.

दरम्यान, देशभक्‍त मुस्‍लिम नेहमी शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला आहे. आपण मराठी आहोत, एकत्र काम करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तुम्ही बंधुत्वाच्या नात्याने आलात आणि मला पाठिंबा दर्शवलात त्याबद्दल आभार असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल.