महाराष्ट्र दिना दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले आणि अगदी थोड्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

Leave a Comment