Thursday, October 6, 2022

Buy now

माहेरी असलेल्या विवाहितेवर दोघांचा बलात्कार

सातारा | माहेरी असलेल्या विवाहितेवर दोघांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव पोलिसांनी अॅट्रासिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत विवाहिता मनोरूग्ण असून गरोदर राहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्यात अनिल भीमराव गायकवाड व संजय आबाजी जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात अनिल गायकवाड व संजय जाधव यांनी तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पोटात दुखत असल्यामुळे कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

कुटुंबीयांनी याविषयी तिला विचारणा केली असता, तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयितांविरोधात अॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सहायक पोलिस अधीक्षक मोहन शिंदे घटनेचा तपास करत आहेत.