Maruti Electric Car : Maruti लाँच करणार पहिली Electric Car; 500 KM पर्यंत रेंज देणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : (Maruti Electric Car) भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. बाजारात दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक रिक्षा लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता देशातील दिग्गज आणि लोकप्रिय कंपनी मारुती सुझुकी सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरली आहे. कंपनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्ज मध्ये ५०० किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल असा कंपनीचा दावा आहे.

मारुती आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Maruti Electric Car) पुढील वर्षी 17-22 जानेवारी दरम्यान सादर करणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची यांनी एका इव्हेंटमध्ये सांगितले की, या वाहनाशिवाय कंपनी आणखी अनेक काही इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचा विचार करत आहे. तसेच २०३० पर्यंत गाड्यांची निर्यात आणखी वाढवण्याची कंपनीची योजना आहे असेही त्यांनी म्हंटल. ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी मारुती सुझुकी ही इलेक्ट्रिक वाहने युरोप आणि जपानसारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात करणार आहे अशी माहिती हिसाशी ताकेउची यांनी दिली.

मारुतीच्या इलेक्ट्रिक कार मध्ये काय खास? Maruti Electric Car

मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार हि एक माध्यम आकाराची SUV कार असेल. EVX असं तिचे नाव असेल. या इलेक्ट्रिक कार मध्ये 60 kWh बॅटरी पॅक बसवण्यात येईल. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर मारुतीची ही इलेक्ट्रिक कार तब्बल ५०० किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकेल. या कारची किंमत 15 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात मारुतीची इलेक्ट्रिक कार, TATA आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक कारला टक्कर देऊन शकते.