कमी बजेटमध्ये नवीन मारुती सुझुकी डिझायर लाँच ; जबरदस्त मायलेजसह उपलब्ध

Maruti Suzuki
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक ग्राहकांना भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये गाडी घेण्याचे स्वप्न असते. पण कोणत्या गाडीचा परफॉर्मन्स आणि मायलेज चांगले आहे, यामध्ये त्यांचा गोंधळ उडालेला असतो . ज्यांना गाडी घ्यायची आहे , मात्र या गोंधळामुळे निर्णय घेता येत नाही , त्यांच्यासाठी आज आम्ही बाजारात नुकतीच लाँच झालेली नवीन मारुती सुझुकी डिझायर 2024 या गाडीबद्दल माहिती सांगणार आहोत. हि कार कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटनुसार डिझाइन केली असून तिच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूमची किंमत 6.08 लाख इतकी आहे. तर चला जाणून घेऊयात कमी बजेटच्या कार बदल संपूर्ण माहिती.

नवीन मारुती सुझुकी डिझायर 2024

नवीन जनरेशन डिझायर 2024 ही मारुती सुझुकीची पहिलीच कार आहे, जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये पाच स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. ही कार ग्राहकांसाठी सुरक्षा आणि टिकाऊपणाच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच या नवीन डिझायरमध्ये 1.2 लिटर Z सिरीज पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 80 बीएचपी पावर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. याशिवाय कंपनीने सीएनजी प्रकार देखील सादर केला असून तो 68 बीएचपी पावर आणि 102 एनएम टॉर्क निर्माण करतो .

स्टायलिश लूक

डिझायर 2024 मध्ये स्टायलिश लूकसाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. बाहेरील डिझाईनमध्ये नवीन ग्रिल, एलईडी हेडलाईट्स, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, आणि एलईडी टेल लाइट्ससह आधुनिक डिझाइन केलेली आहे. त्याचबरोबर आतील डिझाईनमध्ये प्रथमच इलेक्ट्रिक सनरूफ, नऊ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटिरिअर थीम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, आणि 360 डिग्री कॅमेरा यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मायलेजचा बादशाह

या कारला मायलेजचा बादशाह असे देखील म्हणता येईल . कारण यामध्ये पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससह 24.79 किमी/लिटर, तर ऑटोमॅटिक प्रकारामध्ये 25.71 किमी/लिटर मायलेज देते. तसेच सीएनजी मॉडेल एक किलो सीएनजीमध्ये 33.73 किमी/किलो मायलेज प्रदान करते, जे यामधील सर्वोत्तम मानले जाते.

किंमत

डिझायर 2024 कारची किंमत 6.08 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल 10.14 लाखांपर्यंत जाते. या किंमती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध आहेत. ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये चांगले मायलेज, सुरक्षितता, आणि प्रीमियम फीचर्स असलेली कार हवी आहे, त्यांच्यासाठी मारुती सुझुकी डिझायर 2024 एक उत्तम पर्याय आहे.