Maruti Suzuki Swift 2024 : नव्या अवतारात लाँच झाली मारुती स्विफ्ट; नवं इंजिन, जबरदस्त मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नव्या अवतारात आपली लोकप्रिय कार मारुती स्विफ्ट (Maruti Suzuki Swift 2024) लाँच केली आहे. या नव्या कारमध्ये डिझाइन, फीचर्स आणि इंजिनमध्ये बदल करण्यात आला असून आधीच्या गाडीपेक्षा हि नवी कार अतिशय आकर्षक आणि स्टायलिश वाटतं आहे. मारुतीची हि आधुनिक स्विफ्ट आधीपेक्षा जास्त मायलेज दिसते. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा डिलरशिपच्या माध्यमातून तुम्ही कारचे बुकिंग करू शकता. आज आपण या कारची संपूर्ण माहिती आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत

गाडीच्या लूक आणि डिझाईन बाबत सांगायचं झाल्यास, नवीन मारुती स्विफ्टचा आकार आधीच्या स्विफ्टपेक्षा थोडा वेगळा आहे. या कारची लांबी 3860 मिमी, रुंदी 1695 मिमी आणि उंची 1500 मिमी आहे. या कारमध्ये नवीन बंपर, नवीन डिझाइनचे रेडिएटर ग्रिल देण्यात आले आहे. त्याचबरोबर ब्रँडचा लोगो पहिले ग्रिलच्या मध्ये होता तो आता कारच्या फ्रंट बोनटवर देण्यात आला आहे. कंपनीने नवीन स्विफ्टमध्ये मागील दरवाजाच्यावर हँडलचा C-पिलरला हटवून याला पारंपारिक पद्धतीने दरवाजावर दिले आहे.

इंजिन – Maruti Suzuki Swift 2024

नवीन मारुती स्विफ्टमध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या इंजिनमध्ये करण्यात आला आहे. या नव्या मारुती स्विफ्ट मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर, Z-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सला जोडण्यात आलं असून ते 82PS ची पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला सौम्य हायब्रीड तंत्रज्ञानाचा पर्याय देखील दिला जाऊ शकतो, जे अधिक पॉवर आणि मायलेज देते. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये 25.72 किमी प्रतिलीटर मायलेज देते. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास 3 किमी/लीटर जास्त आहे.

अन्य फीचर्स –

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, नवीन मारुती स्विफ्टमध्ये (Maruti Suzuki Swift 2024) 40 हून अधिक कार कनेक्टेड टेक्नॉलॉजी, 9-इंचाची स्मार्ट प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, वाइड अँगल रिअर व्ह्यू कॅमेरा, रियर एसी व्हेंट्स, 16-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील, डिजिटल एसी पॅनल, टाइप-ए आणि टाइप-सी यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स. आणि LED फॉग लॅम्प सारखे फीचर्स देण्यात आलेत.

किंमत किती-

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, नवीन मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.65 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत हि कारHyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago सारख्या कारला थेट टक्कर देईल.