हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात पर्यावरण पूरक साधनांची चलती सुरु आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो इंडस्ट्रीनेही आपल्या वाहनांमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्यास सुरवात केले आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय मार्केटमध्ये CNG गाड्या सुपर फॉर्मात आहेत. एकामागून एक CNG कार बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Maruti Suzuki ने आपली Swift CNG बाजारात आणली आहे . तुम्ही ही कार फक्त 1 लाखात घरी घेऊन जाऊ शकता, परंतु तत्पूर्वी आपण या कारचे फीचर्स जाणून घेऊया.
Maruti Swift CNG मध्ये तुम्हाला 1197 cc पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असून 76.43 bhp च्या कमाल पॉवरसह 98.5 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीच्या दाव्यानुसार, Maruti Swift CNG ही कार एक किलो सीएनजीवर 30.9 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. तसेच ह्या गाडीतील ऍडव्हान्स फीचर्स आणि प्रशस्त केबिन स्पेस तिला आणखीनच रुबाबदार बनवतात .
1 लाखांत घरी घेऊन जा Maruti Swift CNG-
Maruti Swift CNGची एक्स-शोरूम किंमत 7,85,000 रुपये आहे. जे ऑन रोड 9,48,678 रुपयांपर्यंत जाते. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक हफ्त्यांवर देखील हि गाडी खरेदी करू शकता. त्यासाठी Maruti कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फायनान्स प्लॅन घेऊन आली आहे. त्या प्लॅनच्या आधारे जर तुम्ही डाउन पेमेंट आणि EMI calculater च्या मदतीने गणना केली तर बँक तुम्हाला 9.8 टक्के वार्षिक व्याज दरावर 8,48,678 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देते . 5 वर्ष म्हणजेच 60 महिन्यांच्या कालावधीसाठी वरील कर्ज तुम्हाला मिळाल्या नंतर तुम्ही १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन Maruti Swift CNG कार घरी घेऊन जाऊ शकता. ज्या कर्जाचा मासिक हफ्ता हा प्रति महिना 17,948 रुपये आकारण्यात येईल.