लवकरच लॉन्च होणार Maruti Wagon R चे Electric व्हर्जन; काय असेल किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन निर्माता कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येत आहेत. त्याच पार्शवभूमीवर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपली हॅचबॅक कार वॅगन आर इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च करणार आहे. तुम्ही जर रोमांचक आणि स्टायलिश कारच्या शोधात असाल तर नक्कीच मारुतीची वॅगन आर इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी खास ठरेल. आज आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक गाडीचे डिझाइन, वैशिष्टये आणि लॉन्च होण्याची अपेक्षित तारीख याबाबत…

वैशिष्टये –

नवीन वॅगन आरच्या इलेक्ट्रिक मॉडेलच्या एक्सटीरियर्समध्ये नवीन प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम सराउंडसह नवीन रेडिएटर ग्रिल आणि क्लिअर लेन्स टेल लॅम्प असतील. इंटिरिअरमध्ये ड्युअल-टोन स्कीम आणि एक नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल जे बॅटरी चार्जचा स्टेट्स दाखवेल. याशिवाय कोलॅप्सिबल स्टीयरिंग कॉलम, फॉग लॅम्प, चाइल्ड सेफ्टी डोअर लॉक आणि अँटी थेफ्ट सिस्टमची सुरक्षा वैशिष्ट्ये मानक उपकरणे म्हणून ऑफर केली जाईल.

मारुतीच्या या इलेक्ट्रिक वॅगन आर मध्ये 4.8 मीटर टर्निंग सर्कल रेडिअस असलेले पॉवर स्टिअरिंग मिळेल. या इलेक्ट्रिक गाडीला 50 kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळेल. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही कार 90 किलोमीटर धावू शकेल.

मारुतीची इलेक्ट्रिक वॅगन आर ४ प्रकारांमध्ये येण्याची शक्यता आहे –

१) लक्झरी मार्केटसाठी एक Executive व्हेरिएन्ट,

२) ज्यांना जास्त पॉवर हवी आहे त्यांच्यासाठी एक स्पोर्टी व्हेरिएन्ट,

३) ज्यांना उत्तम राइड क्वालिटी हवी आहे त्यांच्यासाठी कॅम्फोर्ट व्हेरिएन्ट,

४) आणि शेवटी इकोनो व्हेरियंट जे कमी बजेटच्या खरेदीदारांसाठी योग्य असेल.

किंमत –

जर तुम्ही प्रशस्त आणि आरामदायी कार शोधत असाल तर मारुती वॅगनआर इलेक्ट्रिक तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. खास करून शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही कार जास्त योग्य पर्याय आहे. अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही कार गाडी चालवणे आनंददायी ठरणार आहे. या इलेट्रीक गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, मारुती वॅगन आर EV ची किंमत 10.00 लाख रुपये पर्यंत असू शकते. Wagon R EV कधी लॉन्च होईल याबाबत नेमकी तारीख जाहीर झाली नसली तरी 2023 मध्येच ही गाडी बाजारात येण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी वॅगन आर ईव्ही महिंद्रा ई2ओ आणि टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांना तगडी फाईट देईल.