हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण कोणत्या हॉटेल वर किंवा OYO रूममध्ये राहण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला कोणता तरी पुरावा मागितला जातो. आपण सहसा अशावेळी आधार कार्डच सगळीकडे देत असतो. परंतु आधार कार्डवर आपले सर्व डिटेल्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते. तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा OYO रूममध्ये आधार कार्ड देणं तुम्हाला अडचणीत टाकू शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही मची माहिती लीक होण्यापासून पासून शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात….
तुमचे आधार कार्डचे सर्व डिटेल्स कुठेही लीक होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल, तर हॉटेल किंवा ओयो रूममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही Masked Aadhaar Card ओळखपत्र म्हणून द्या. हे आधार कार्ड दिल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स सुरक्षित राहू शकतात. कारण Masked Aadhaar Card मध्ये आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात, म्हणजेच लोकांना फक्त शेवटचे 4 अंक पाहता येतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचे सर्व डिटेल्स कोणाला समजत नाहीत आणि त्यामुळे कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही.
अशा प्रकारे डाउनलोड करा Masked Aadhaar Card
यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
यानंतर, आता आधार विभागात जा आणि ‘माय आधार’ या पर्यायावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर, तुम्हाला येथे तुमचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा भरावा लागेल. यानंतर Send OTP पर्याय निवडा.
आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल जो तुम्हाला भरावा लागेल.
ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर डाउनलोडचा पर्याय तुमच्या समोर येईल.
तुम्ही डाउनलोड पर्याय निवडताच, तुम्हाला चेकबॉक्समध्ये विचारले जाईल की तुम्हाला मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे का.
तुम्हाला इथे बरोबर अशी खूण करावी लागेल.
चेकबॉक्सवर टिक करून सबमिट केल्यानंतर, मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड केले जाईल.
Masked Aadhaar Card पासवर्डसह सुरक्षित असते.
या पासवर्डसाठी तुम्हाला तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष भरावे लागतील.
एकदा का हे सर्व डिटेल्स भरले कि मग तुम्हाला तुमचे मास्कड आधार कार्ड दिसेल.