हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहरचे (Masood Azhar) संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत रात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बारनाला, सरजाल आणि महमूना याठिकाणी हल्ले केले. यातील बहबलपूर मध्ये मसूद अझहरचे कुटुंब राहत होते. या कुटुंबातील सर्व सदस्य ठार झाले आहेत. परंतु हल्ल्याच्या वेळी मसूद अझहर घरी उपस्थित नव्हता. त्यामुळे तो वाचला आहे.
भारतीय हवाई दलाने सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बहबलपूरमधील मसूद अझहरच्या घरावर पहाटे १.३० वाजता हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील १४ दहशतवादी मारले गेले. मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत असतानाच परिसरात बॉम्ब टाकण्यात आले, त्यात कुटुंबातील १४ जण मारले गेले. परंतु मसूद अझहर घरी उपस्थित नव्हता. भारताच्या एअर स्ट्राइकच्या वेळी मसूद अझहरची (Masood Azhar) मोठी बहीण, मौलाना कशफचे संपूर्ण कुटुंब, मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातू, मोठी मुलगी शहीद बाजी सादिया हे तिच्या पती आणि चार मुलांसह घरात झोपले होते. त्याचवेळी भारताने हल्ला केला.
हे पण वाचा : Operation Sindoor ची इनसाईड स्टोरी; कोणी आखला प्लॅन?
कोण आहे मसूद अझहर- Masood Azhar
मसूद अझहर हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख आहे. त्याचा जन्म 10 जुलै किंवा 7 ऑगस्ट 1968 रोजी पाकिस्तानातील बहावलपूर, पंजाब येथे झाला. तो एक कट्टर इस्लामवादी आणि दहशतवादी आहे, जो प्रामुख्याने पाकिस्तान-नियंत्रित काश्मीरमध्ये सक्रिय आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड मानला जातो, ज्यात 2001 चा भारतीय संसद हल्ला, 2016 चा पठानकोट हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ल्याचा समावेश आहे. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 विमान अपहरण प्रकरणात त्याला भारताने नाईलाजाने सोडले होते, जेव्हा दहशतवाद्यांनी प्रवाशांच्या सुटकेसाठी त्याची आणि इतर दोन दहशतवाद्यांची मागणी केली होती. 1 मे 2019 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले




